कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथे शेतकरी शरद कडूबा थोरात यांच्या शेतातील एक एकर मका अचानक पेट घेऊन जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नेहमीप्रमाणे गुरांना चारा-पाणी करण्यासाठी गेलेल्या थोरात यांना गाय-गोठ्याजवळील मकापुंज पेटलेला दिसला.या ठिकाणी आग लागण्यासारखे कोणतेही साधन नसताना मका पेटलेला दिसल्याने अज्ञात व्यक्तिने जाणूनबुजून आग लावली असावी असा संशय शेतकऱ्याने व्यक्त केला आहे.