जालना: जालन्यात न्यू शिवगंगा वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या लॉजवर पोलिसांचा छापा; 7 पीडित महिलांची सुटका
Jalna, Jalna | May 22, 2026 जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई करत बसस्थानक रोडवरील न्यू शिवगंगा लॉजवर छापा टाकला. या कारवाईत 7 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून रोख रक्कमेसह 77 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुक्रवार दि. 22 मे 2026 रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी महिलांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सदर बाजार पोलीस करत आहेत.