सिकलसेल आजार जनजागृती सप्ताह निमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. ओमकार पवार, जिल्हा परिषद नाशिक यांचे नागरिकांना आवाहन.
११ ते १७ डिसेंबर या दरम्यान सिकलसेल आजार जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. सिकलसेल हा अनुवंशिक आजार असून यामध्ये वाहक व रुग्ण असे दोन प्रकार असतात. या सप्ताहात सर्व शासकीय आरोग्य संस्थेत सिकलसेल आजाराची तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे, तरी 0 ते 40 वर्ष वयोगटातील सर्व नागरिकांनी सिकलसेल आजाराची रक्त तपासणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागा मार्फत करण्यात येत आहे.