खामगाव: घरावरून पडल्याने ६० वर्षीय इसम जखमी झाल्याची घटना खामगाव शहरातील चांदमारी येथे घडली
घरावरून पडल्याने ६० वर्षीय इसम जखमी झाल्याची घटना खामगाव शहरातील चांदमारी येथे १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेदरम्यान उघडकीस आली आहे.खामगाव शहरातील चांदमारी भागातील संभाजी पुंडलिक तासतोडे वय 60 वर्ष हे घरावरून पडल्याने ते जखमी झाले त्यांना लगेच खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केली असता डॉक्टरांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर केले आहे. अशी माहिती सामान्य रुग्णालयातून मिळाली आहे.