दिग्रस: शहराच्या मध्यवर्ती भागात फटाका मार्केट; नियमांचे उल्लंघन करून दुकाने उभारली, प्रशासनेने लक्ष देण्याची मागणी
दिग्रस शहरातील श्रीकृष्ण टॉकीज परिसरात फटाका मार्केट लावण्यात आले असून, या ठिकाणी २० पेक्षा जास्त दुकाने उभारण्यात आली आहेत. मात्र ही सर्व दुकाने अग्निशमन नियमांचे उल्लंघन करून लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सदर फटाका मार्केट शहराच्या मध्यवर्ती भागात असून, येथे मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा करण्यात आला आहे. परिसरात शासकीय मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे आवश्यक सुरक्षित अंतर राखण्यात आलेले नाही. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी नागरिकांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे.