नाशिक: घटांच्या सौंदर्यीकरणावर अधिक भर द्या : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन.
Nashik, Nashik | Sep 17, 2025 नाशिक, दि.17 सिंहस्थ कुंभमेळा हा जागतिक दर्जाचा सोहळा असून देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत. पर्वणी काळातील अमृतस्नानासाठी नवीन घाटांची निर्मिती करतांना त्यांचे सौंदर्यीकरणावर भर द्यावा, तसेच सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत, अशा सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात विविध शासकीय विभागांचा आढावा मंत्री महाजन यांनी घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री उपस्थित होत