कामठी: मैत्रिणीच्या घरी खेळायला गेली;चिमुकली झाली वासनेचा शिकार,मैत्रिणीच्या वडिलांनीच केला बलात्कार,न्यू खलाशी लाईन येथे घटना
Kamptee, Nagpur | Sep 18, 2025 पोलीस ठाणे जुनी कामठी हद्दीतील न्यू खलाशी लाईन येथे मैत्रिणीच्या घरी खेळायला गेलेल्या चिमुकलीवर मैत्रिणीच्या वडिलांनीच बलात्कार केल्याची खळबळजणक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी आरोपी रोहित पाटील वय 35 वर्ष विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.. ही घटना साधारण दीड महिन्या अगोदर घडली असल्याची माहिती समोर आली आहे.