नागपूर ग्रामीण: नागपुरातून दोन चिमुरडे बेपत्ता; बेलतरोडी परिसरात खळबळ, शोध घेण्याचे आवाहन
पोलीस स्टेशन बेलतरोडी अंतर्गत येणाऱ्या न्यू मनीष नगर परिसरातून दोन लहान मुले खेळता खेळता बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ३० एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास ही मुले घराबाहेर पडली होती, मात्र बराच वेळ होऊनही ती घरी न परतल्याने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दोन मुले गुरुवारी सकाळी घराबाहेर खेळण्यासाठी गेली होती. मुले बराच वेळ दिसली नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली, मात्र त्यांचा पत्ता लागला नाही.