माजलगाव: सावरगाव येथे शेतकी अधिकाऱ्याच्या वाहनाची हवा सोडली
माजलगाव तालुक्यात आंदोलन पेटले आहे. युवा शेतकरी संघर्ष समितीकडून ऊसाला योग्य दर मिळावा या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. शनिवार, 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता सावरगाव येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्यासमोर आंदोलनकर्त्यांनी कारखान्याच्या शेतकी अधिकारी यांच्या वाहनांची हवा सोडून दिली. ऊसाला दरवाढ मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू, असा आक्रमक इशारा युवा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे.