दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणाऱ्या खासगी बसमालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईची मोहिम सुरू केली आहे. ही मोहिम ३ नोव्हेंबरपर्यंत राबवली जाणार असून, भाडे मर्यादा ओलांडणाऱ्या बसगाड्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता पाठवलेल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले. खासगी बसचे भाडे राज्य परिवहन बसच्या 1.5 पट पेक्षा अधिक नसावे. जास्तीचे भाडे आकारल्यास तिकीटाच्या आधारे d