यावल: यावल शहरात घडले जातीय सलोख्याचे दर्शन, मुस्लिम वृद्धाचा हिंदू कुटुंबाच्या घरून निघाला जनाजा, देवरे सोनार कुटुंबाचे कौतुक
यावल शहरात अशोक देवरे सोनार, ज्योती देवरे सोनार, ऋषी देवरे सोनार या कुटुंबाकडे कय्यूम खान नूर खान वय १०० हे वृद्ध वयाच्या २० वर्षापासून सराफी कारागीर म्हणून कार्यरत होते. ८० वर्ष त्यांच्या घरी ते कार्य करत असताना उतार वयात सोनार कुटुंबाने त्यांची देखभाल केली होती व आपल्या परिवारात सारखी वागणूक त्यांना दिली होती त्यांच्या मृत्युपच्या मयत खान बाबा यांची अंत्ययात्रा देखील देवरे सोनार कुटुंबाच्या घरापासून निघाली आणि येथे जातीय सलोख्याचे चित्र दिसून आले.