गोरेगाव: सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते पंचायत समिती येथे येथे निशुल्क पट्टे वाटप
सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत गोरेगाव येथे आज आबादी जागेवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना शासनाच्या नियमांनुसार निशुल्क पट्टे वाटप करण्यात आले.त्यासोबतच सनद वाटप,विविध शासकीय दाखले, डीजीटल रेशन कार्ड, संजय गांधी श्रावण बाळ निराधार योजना,इतर विभागाचे लाभ वाटप आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते लाभार्थ्यांना पट्टे प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंकज रहांगडाले उपसभापती रामेश्वर महारवाडे चित्रकला चौधरी आदी उपस्थित होते