भोसरी परिसरात नाल्याजवळ गांजा बाळगून विक्रीसाठी फिरताना पोलिसांनी एका तरुणास अटक केली. ही कारवाई इंद्रायणीनगर, भोसरी येथे करण्यात आली.अक्षय रामभाऊ माने (वय २५, रा. सदगुरुनगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अंमलदार महादेव गुलाब गारोळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.