हिंगोली: हिंगोलीत जनावरे चोरणाऱ्या तिघा जणांना हिंगोली कळमनुरी मार्गावर पकडले
हिंगोली सेनगाव तालुक्यातील जनावरे चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दिनांक 16 ऑक्टोबर रोजी हिंगोली कळमनुरी मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडून दोन चार चाकी वाहनासह 4 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. अशी माहिती आज दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी तीन वाजता प्राप्त झाली आहे.