आज २० नोव्हेंबर गुरुवार रोजी दुपारी दीड वाजता धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाची संघटनात्मक आढावा बैठक चांदूर रेल्वे येथे प्रचंड उत्साह आणि गर्दीत यशस्वीरीत्या पार पडली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे ही बैठक विशेषत्वाने ऐतिहासिक ठरली. चांदुर रेल्वे शहरातील सर्व प्रभागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून काँग्रेसची संघटनशक्ती आणि एकजूट ठामपणे दाखवून दिली.या आढावा बैठकीच्या मंचावर खासदार बळवंत वानखडे....