अचलपूर: जयस्तंभ चौक ते लालपूल मार्गावरील धोकादायक लोखंडी सुरक्षा कठडे सार्वजनिक बांधकाम विभागाने काढले
शहरातील जयस्तंभ चौक ते लालपूलकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील मदन महल समोरील दुभाजकावर बसविण्यात आलेले लोखंडी सुरक्षा कठडे वाकलेल्या स्थितीत असल्याने ते केव्हाही दुर्घटनेचे कारण ठरू शकत होते. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरणारे हे कठडे अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने काढून टाकले. वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या या मार्गावर सुरक्षा कठडे वाकलेले असल्याने अपघाताचा धोका वाढला होता. वाहनधारक व पादचारी यांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये, म्हणून विभागाने केलेल्या या कारवाईम