हिंगोली: जिथे माझ्या कार्यकर्त्यांना काही मिळणार नाही तिथे मी राहणार नाही: माजी काँग्रेसचे आमदार भाऊराव पाटील
हिंगोली विधानसभेचे काँग्रेसचे कट्टर समर्थक व तीन वेळेस काँग्रेस पक्षाकडून हिंगोली विधानसभेवर निवडून आलेले, भाऊराव पाटील गोरेगावकर हे शिंदे गट शिवसेनेत प्रवेश निश्चित झाला असून, आज दिनांक 12 ऑक्टोबर रोजी गोरेगाव येथे दुपारी एक वाजता पत्रकारांशी बोलताना म्हणाले की ज्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांना काही मिळणार नाही तिथे मी राहणार नाही. असे वक्तव्य करत ते बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.