जळगाव शहराचा सर्वांगीण विकास करण्याची ताकद फक्त महायुतीकडेच आहे, असा विश्वास आमदार राजूमामा भोळे यांनी रविवारी 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता व्यक्त केला. शहरातील विविध प्रभागांमध्ये सुरू असलेल्या प्रचारादरम्यान नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीचाच महापौर निवडून येणार, असे त्यांनी सांगितले.