दुर्गा माता व छठी माता मंदिरात अज्ञात चोरांनी डल्ला मारला. चोरांनी मंदिराचे कुलूप तोडून देवीच्या मूर्तीवरील सोने व चांदीचे दागिने चोरून नेले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.स्थानिक नागरिकांनी तातडीने जुनी कामठी पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.