जालना: मास्टर फुलंब्रीकर नाट्यगृह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह दुरुस्ती करुन सुरु करण्याची मागणी; आयुक्तांना निवेदन
Jalna, Jalna | Oct 15, 2025 जालना शहरातील मास्टर फुलंब्रीकर नाट्यगृह आणि टाऊन हॉल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह याची दयनीय अवस्था झाली असून हे सभागृह तात्काळ दुरुस्त करून ते सुरू करावे अशी मागणी जालना शहरातील सामाजिक कार्यकर्त्या सौ. रसना देहेडकर आणि इतर नागरिकांनी केली. यासंदर्भात बुधवार दि. 15 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता आयुक्त संतोष खांडेकर यांना निवेदन सादर करण्यात आले. जालना शहर हे सांस्कृतिक परंपरा जपणारे शहर म्हणून ओळखले जाते. तत्कालीन नगराध्यक्ष स्व. माणिकचंद बोथरा यांनी बांधले होते.