नागपूर ग्रामीण: प्रलंबित कमिशनसाठी रास्त भाव दुकानदारांचा एल्गार; उपोषणाचा इशारा
गेल्या सहा महिन्यांपासून थकीत असलेले कमिशन न मिळाल्याने नागपुरातील रास्त भाव दुकानदार (रेशन दुकानदार) आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाकडे अनेकदा पाठपुरावा करूनही निधी मिळत नसल्याने, संतप्त दुकानदारांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून, लवकरात लवकर मागणी मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.