हिंगोली: शेतकरी आत्महत्यांवर उपायासाठी वारकरी साहित्य परिषदेची दिंडी नरसी नामदेव येथे दाखल
हिंगोलीत वारकरी साहित्य परिषदेची दिंडी हिंगोली जिल्ह्यात मोठ्या उत्साहात दाखल झाली असून या माध्यमातून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आज दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी दोन वाजता दरम्यान आयोजन करण्यात आले. नरसी नामदेव येथे झालेल्या या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मानसिक धैर्य देण्यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात आले.