अंजनगाव सुर्जी: बोराळा ते जसापूर येथे पाणी न दिल्याने इसमाला काठीने मारहाण;खल्लार पोलिसांनी दोघांवर केला गुन्हा दाखल
पाणी का दिले नाही, असे म्हणून दोघांनी एका ५२ वर्षीय इसमाला शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याची घटना बोराळा बसस्टॅन्ड तेजसापूरदरम्यान १६ ऑक्टोबर रोजी घडली.राजेश उत्तमराव निंबाळकर (५२) रा. बोराळा असे फिर्यादीचे नाव आहे.१० वाजताच्या दरम्यान निंबाळकर हे त्यांच्या दुचाकीने जात असताना आरोपी सागर लालसिंग मलिये व रोशन श्रीकृष्ण तंतरपाळे दोघेही रा.नागपूर यांनी त्यांना थांबवून म्हटले की,तू आम्हाला काल पाणी का दिले नाही.