भोकरदन: कुंभारी येथे तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्सवात संपन्न
आज दिनांक 25 एप्रिल 2024 वार शनिवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथे जगाला शांतीचा संदेश देणारी तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आहे ही मूर्ती प्राणप्रतिष्ठा गावातील बुद्ध महिलांच्या वतीने करण्यात आली असून जगाला शांतीचा संदेश देणारे या महापुरुषाची मूर्ती आमच्या गावात पाहिजे हा विचार डोक्यात घेऊन या महिलांनी हे मूर्ती स्थापन केली आहे, यावेळी भिकू संघासह बौद्ध समाज बांधव महिला मंडळ उपस्थित झाले होते.