जालना: श्री आनंदी स्वामी महाराजांच्या पालखीचे जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, महापौर वंदना मगरे व उपमहापौर राजेश राऊत यांनी घेतले दर
Jalna, Jalna | Jul 25, 2026 जालना शहराचे आराध्य दैवत आणि 'छोटे पंढरपूर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री आनंदी स्वामी महाराजांच्या पालखी सोहळ्याला यंदाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शनिवारी सकाळी श्री आनंदी स्वामी महाराज मंदिरातून पालखीचे विधिवत प्रस्थान झाले. शनी मंदिर, गणपती गल्ली, बाजार गल्ली, गांधी चमन आदी प्रमुख मार्गांवरून पारंपरिक दिंडी, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि "श्री आनंदी स्वामी महाराज की जय"च्या घोषणांनी वातावरण भक्तिमय झाले. रात्री उशिरापर्यंत पालखी पुन्हा श्री आनंद स्वामी महाराज मंदिरात दाखल होणा