बदनापूर: गेवराई बाजार परिसरामध्ये रेल्वेपटरी परिसरात शेतात आढळले बिबट्याचे पिल्ले, शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण
आज दिनांक 2 डिसेंबर २०२५ वार मंगळवार रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास गेवराई बाजार परिसरात असणाऱ्या रेल्वे भरती भागात एका शेतकऱ्याच्या शेतात बिबट्याचे पिल्ले आढळून आले आहे, हे बिबट्याचे पिल्ले शेतकरी व विष्णू भाऊ लहाने या शेतकऱ्यांना दिसून आले असून त्यांनी इतर शेतकऱ्यांना ही माहिती दिली, शेतकऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरली आहे ,त्यामुळे वन विभागाने वेळीच या बिबट्याच्या पिल्लांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना भयमुक्त करावे अशी मागणी होत आहे.