जालना: सीमेवर नवरा, बांधावर पत्नी! थिगळखेडा येथील फौजी गजानन ढवळे आणि कविता ढवळे यांचा संघर्ष ठरतोय प्रेरणादायी
Jalna, Jalna | Jul 4, 2026 सीमेवर नवरा, बांधावर पत्नी! थिगळखेडा येथील फौजी गजानन ढवळे आणि कविता ढवळे यांचा संघर्ष ठरतोय प्रेरणादायी आज दिनांक 4 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार देशाच्या संरक्षणासाठी सैनिक सीमेवर अहोरात्र तैनात असतात, मात्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या कुटुंबीयांचा त्यागही तितकाच मोठा असतो. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील थिगळखेडा येथील फौजी गजानन ढवळे आणि त्यांच्या पत्नी कविता ढवळे यांचे जीवन याच त्याग, कर्तव्य आणि जिद्दीचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. भारतीय सै