नांदेड: विष्णुपुरी धरणाचे 14 दरवाजे उघडण्यात आले गोदावरी नदीला आला मोठा पूर
Nanded, Nanded | Sep 17, 2025 आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी 3 च्या दरम्यान विष्णुपुरी धरणाचे यावर्षी पहिल्यांदाच 14 दरवाजे उघडण्यात आले विष्णुपुरी धरणात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, म्हणून विष्णुपुरी धरणाचे 14 दरवाजे उघडण्यात आलेत सध्या गोदावरी नदीपात्रात 1 लाख 55 हजार 735 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून, गोदावरी नदी दुधडी भरून वाहत आहे,गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. गोदावरी नदीकाठच्या शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे