आष्टी: मुसळधार पावसामुळे आष्टी तालुक्यातील कडा शहरात पूर परिस्थिती निर्माण जनजीवन विस्कळीत
Ashti, Beed | Sep 15, 2025 कडा शहरातील पुराची सद्यपरिस्थिती अशी आहे.. तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पावसाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, शाळेतील विद्यार्थी यांची काळजी घ्यावी, कोणत्याही ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असताना प्रवास करण्याचा प्रयत्न करू नये.... आपली गुरेढोरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, कोणतीही आपत्तीची घटना घडून आल्यास तात्काळ पोलीस ठाणे आष्टी व तहसील कार्यालयास कळवावे असे आवाहन आमदार सुरेश आण्णा धस व पोलीस निरीक्षक आष्टी यांनी केले आहे.