नागपूर ग्रामीण: : बुटीबोरी येथील दाम्पत्याला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
बुटीबोरी येथे एका दाम्पत्याला शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची खळबळजनक घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा छडा लावत दोन मुख्य आरोपींना निष्पन्न केले आहे. पहिला आरोपी अफरोज पठाण याला पोलिसांनी वाठोडा परिसरातून अटक केली आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून या दरोड्यात त्याचा सक्रिय सहभाग होता.