भंडारा तालुक्यातील कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत कोकणागड येथे एका ६५ वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपी जावयासह त्याच्या एका मित्राला अटक केली आहे. ९ जानेवारी २०२६ पासून बेपत्ता असलेले किशोर धर्मा कंगाले यांचा मृतदेह ११ जानेवारी रोजी धारगाव-कोकणागड मार्गावरील एका पुलाच्या सिमेंट पिलरमध्ये संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय मृताच्या नातेवाईकांनी व्यक्त केला...