नागपूर ग्रामीण: सामाजिक समता सप्ताहाचा समारोपिय कार्यक्रम संपन्न, 31 पात्र वारसांना शासकीय नोकरीचे नियुक्ती आदेश प्रदान
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प शासनाने सोडला असून, दीक्षाभूमीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सामाजिक समता सप्ताहाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.दीक्षाभूमी विकासासाठी १८१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, सर्वांना विश्वासात घेऊन महिनाभरात काम सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.