सेनगाव: कृषीपंप विज जोडणी देण्यास महावितरण करून टाळाटाळ,वटकळी येथील शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा
सेनगांव तालुक्यातील वटकळी येथील एका शेतकऱ्याने महावितरण कडून विद्युत जोडणी देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी आत्मदहन करण्याचा इशारा महावितरण कार्यालयाला निवेदनाद्वारे दिला आहे. वटकळी येथील शेतकरी अमृता नाथराव शिंदे यांनी शेतीसाठी विद्युत जोडणी साठी रीतसर मागणी केली होती. मात्र आतापर्यंत केवळ महावितरणाने टाळताळ केल्याचा आरोप त्यांनी करत उद्या 17 सप्टेंबर रोजी आत्मदहन छेडण्याचा इशारा दिला आहे.