ग्रामपंचायत भेंडाळा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत भवनाचे उद्घाटन आज दि 16 ऑक्टोबर 12 वाजता खा. धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. गावाच्या विकासासाठी आणि प्रशासनिक सोयीसाठी ही अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. विशेष बाब म्हणजे मी आमदार असताना ग्रामपंचायत भवनाच्या कामाला मंजूरी दिली होती आणि आज या नव्या भवनाचे उद्घाटन करण्याचा मान मला लाभला, याचा मला प्रचंड आनंद आहे.असे खा. प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.