साक्री: पिंपळनेर पोलीस ठाण्यात सामूहिक वंदे मातरम गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न; अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती
Sakri, Dhule | Nov 7, 2025 भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम ला दीडशे वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या आवारात सामूहिक वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.जाज्वल्य देशभक्तीसाठी प्रेरणा देणारे, मातृभूमीविषयी ओढ निर्माण करणारे,प्रेरणा देणारे गीत म्हणजे वंदे मातरम होय.या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. आजही या गीतातून भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे, त्यांच्या अतुल्य योगदानाचे स्मरण होते. मातृभूमीबाबतचे प्रेम, अभिमान व्यक्त करणारे गीत म्हणजे वंदे मातरम