पाटोदा: ढाळेवाडी येथील साठवण तलावाचे आमदार सुरेश धस यांनी जलपूजन आणि लोकार्पण केले
Patoda, Beed | Oct 11, 2025 साठवण तलाव लोकार्पण व जलपूजन संपन्न झाला. ढाळेवाडी (ता. पाटोदा) मध्ये ₹४.८६ कोटींच्या साठवण तलावाचे लोकार्पण व जलपूजन झाले. मार्च २०२४ मध्ये मंजुरी मिळाल्यानंतर हुले कन्स्ट्रक्शनने एका वर्षात तलावाची भिंत व सांडव्याचे काम पूर्ण केले. या तलावामुळे सुमारे १२६ हेक्टर शेतीक्षेत्राला पाणी मिळेल. शेतकरी फळबाग, पालेभाज्या व इतर पिकांसाठी सिंचन सोपे होईल. असे आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केले तलावामुळे ढाळेवाडी व अरणगाव परिसरात रोजगार व स्थैर्यही वाढेल. असे ते म्हणाले.