अमरावती: पदोन्नतीचे आमिष दाखवून नर्सवर अडीच वर्ष लैंगिक अत्याचार; पोटे आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्यावर गुन्हा दाखल
पोटे आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्यामसुंदर भुतडा (वय ५४) यांच्याविरोधात नर्सवर अडीच वर्ष लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेने १९ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीनंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सध्या आरोपी फरार असून या घटनेने जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. तक्रारीनुसार, पीडिता २०२२ पासून महाविद्यालयात कार्यरत होती. १६ डिसेंबर २०२२ रोजी डॉ. भुतडा यांनी पदोन्नतीचे आमिष दाखवून तिला पोटे टाऊनशिप येथील नि