सेनगाव: तालुक्यात धुक्याचे सावट,रब्बी हंगामातील पिके धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत
सेनगाव तालुक्यातील आजेगाव सह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धुक्याचे सावट निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. धुके हे रब्बी हंगामातील पिकांसाठी धोकादायक असल्याचे शेतकरी वर्गातून सांगण्यात येत आहे.सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात धुके पडत असून त्यामुळे या धुक्यामध्ये रस्ते सुद्धा हरवून जात आहेत अगोदर शेतकरी अडचणीत असताना त्यातच आता सेनगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सकाळच्या सुमारात धुके निर्माण होत असल्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाले.