नगर: कार्यमुक्त कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण सुरू
पंचायत समितीत कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या अश्विनी औटी यांना पारनेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी कामाबाबत तक्रार नसतानाही कार्यमुक्त केले आहे. या प्रकरणात वरिष्ठांकडे वेळोवेळी सुनावणी होऊन अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी औटी यांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले असतानाही अधिकाऱ्यांकडून वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. त्यामुळे १३ ऑक्टोबरपासून औटी कुटुंबियांनी उपोषण सुरू केले आहे