तिरोडा: सेवानिवृत्त शिक्षक डी.डी.चौरागडे यांचे मंगेझरी जंगल परिसरात अपघाती निधन
Tirora, Gondia | Oct 7, 2025 गोरेगाव तालुक्यातील परशुराम हायस्कुल मोहगाव (बु.) येथील सेवानिवृत्त शिक्षक डी.डी.चौरागडे (विद्यमान रहिवासी तिरोडा) यांचे आज ७ ऑक्टोंबरला गोरेगाव -तिरोडा मार्गावरील मंगेझरी जंगलपरिसरात अपघाती निधन झाले. पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली असून चौरागडे यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीकरीता आणण्यात आले आहे. त्यांच्या मागे बराच आप्त परिवार असून उद्या ८ आँक्टोंबरला तिरोडा येथील मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.