सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते. योजनेंतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी योजनेचा लाभ घेण्याकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेस ऑनलाईन अर्ज करण्याकरीता 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असेआवाहन करण्यात आले आहे.