दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला गुन्हेगार पुन्हा पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी वावरताना आढळून आला. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकाने बजाजनगर परिसरातून संबंधित आरोपीस ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार संदीप प्रकाश तागड यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. दि. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी हेमंत अंकुश पुंड (वय २६, रा. अयोध्यानगर, बजाजनगर) हा तडीपार प्रताप चौक, बजाजनगर येथे आला असता तत्काळ छापा टाकत रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले.