कपिल नगर परिसरातील शासकीय बाल गृहात एका कर्मचाऱ्याने मद्यपान करून कर्तव्यावर हजर राहिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नगरसेवक वसीम खान यांनी या प्रकाराचा पर्दाफाश केल्यानंतर खळबळ उडाली आहे.दोषी कर्मचाऱ्याचे नाव के. एस. हिवराळे असे सांगण्यात आले आहे. कपिल नगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आरोपीने नशेत असल्याची कबुली दिली असून, अधीक्षकांनी त्याच्या वैद्यकीय चाचणीची मागणी केली आहे.