जालना: जालना जिल्ह्यात 12 व 13 मे रोजी ‘यलो अलर्ट’; नागरिकांना उष्माघातापासून बचावाचे आवाहन
Jalna, Jalna | May 12, 2026 भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यासाठी दि. 12 व 13 मे, 2026 रोजी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, या कालावधीत उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मंगळवार दि. 12 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.