महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागास १४ ई-शिवाई वातानुकूलित बसेस प्राप्त झाल्या असून या बसेसचे लोकार्पण पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते वर्धा बसस्थानक येथे झाले.खेड्यापाड्यातील हजारो नागरिक आपल्या कामासाठी बसचा प्रवास करतात. जिल्ह्यातील अशा प्रवाशांचा प्रवास सुखकर, समाधानी करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.