वणी: नगरपालिकेच्या मतदारयादीत मोठा घोळ,मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांची शिवमुद्रा कार्यालय येथे पत्रकार परिषदेत माहिती
Wani, Yavatmal | Oct 12, 2025 नगरपालिकेच्या मतदारयादीत मोठा घोळ करण्यात आला आहे. वणीची प्रभाग रचना बदलली. प्रभाग रचना बदलल्यावर मतदारयादी अपडेट करणे गरजेचे होते. मात्र पालिका प्रशासनाने मतदारयादी अपडेट केली नाही. नागरिकांना मतदारयादीच्या घोळात गुंतवून ठेवण्याचा हा प्रकार असून मतदार जर गुंतून राहिले तर पालिकेला इतर मनमानी कारभार करण्याची मुभा मिळेल. यासाठीच हे षडयंत्र आहे, असा आरोप मनसेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांचा नगरपालिकेवर केला.