भारतमातेच्या रक्षणासाठी सीमेवर लढताना आपल्या प्राणांची आहुती देणारे भंडारा जिल्ह्याचे वीर सुपुत्र शहीद मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांच्या आठव्या बलिदान दिनानिमित्त आज, २३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता दरम्यान खात रोड खोकरला येथील वृद्धाश्रमात एका विशेष श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. "शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर अमर रहे" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. याप्रसंगी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक, मित्रपरिवार आणि मान्यवरांनी मेजर प्रफुल्ल यांच्या स्मृतींना उजाळा देत