नागपूर ग्रामीण: कोराडीत पुलावरून पडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यु
कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी व्यक्तीचा पुलावरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ९ जून २०२६ रोजी सकाळी ८:३० च्या सुमारास, कोराडी मंदिर मार्गावरील भक्त निवासासमोर असलेल्या नवीन पुलावरून एक ३० ते ३५ वयोगटातील पुरुष खाली तलावाच्या चिखलात पडला होता. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने उपचारासाठी मेयो हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.