जालना: जालन्यात विविध मागण्यांसाठी ग्रामरोजगार सेवक संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा…
Jalna, Jalna | Apr 13, 2026 जालन्यात विविध मागण्यांसाठी ग्रामरोजगार सेवक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. हलगी वाजवत निघालेल्या या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ग्राम रोजगार सेवकांना वेतनश्रेणी लागू करावी, वरिष्ठतेनुसार पदोन्नतीची संधी द्यावी, तसेच अपघाती किंवा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. शहरातील महात्मा गांधी चौकापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. याठिकाणी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर क