1 फेब्रुवारीला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीतील लाडी कर लेआउट येथे जयश्री खरे यांच्याकडून ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला होता या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने तपास करून एका अल्पवयीन ला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून तब्बल सहा गुन्ह्यांचा खुलासा केला आणि एक लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्याच्या फरार साथीदाराचा शोध पोलीस घेत आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे